नागपूर: मराठी माणसाला इंग्रजी भाषा शिकल्याचा अभिमान वाटतो. मात्र आपलीच भारतीय भाषा हिंदी शिकल्याने त्याचा अवमान कसा होतो, हेच मला समजत नाही. या मुद्द्याचा निवडणुकीत कोणाला किती फायदा होईल, हे सांगता येत नाही. .मात्र, यापेक्षा विरोधकांनी यावरून निर्माण होणारे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.पहिलीपासून हिंदी शिकवल्यास ती भाषा सहज शिकता येऊ शकते. त्यात मराठीला डावलले जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मराठी भाषेवरून कुठलेही राजकारण झालेले नाही..असे असताना हा गैरसमज परसवला जात आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली. त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषा पाचवीनंतर सक्तीची आहे. पहिलीपासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती. त्यासोबत बाल वयात तिसरी भाषा सहज शिकता यावी म्हणून उद्धव ठाकरे यांनी हिंदीची शिफारस नियुक्त केलेल्या समितीने केली होती. .मराठी इंग्रजीसोबत हिंदी पहिल्या वर्गापासून शिकविली तर ती सहज शिकता येते याच्यात मराठीचा काय संबंध आहे. मराठी माणसांनी इंग्रजी शिकणे अभिमान, पण मराठी माणसांनी हिंदी शिकणे म्हणजे मराठीचा अवमान हे अजून मला समजलं नाही. .NEET Coaching Center Scandal: पवार, खाटोकरला न्यायालयीन कोठडी; बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचे प्रकरण.मी चॅनलवरून ऐकला आहे की हे दोन्ही बंधू सोबत आले तर आपण त्यांच्यासोबत जायचे नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे. या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल की नाही हे मला माहिती नाही. मात्र, यावरून निर्माण झालेले गैरसमज दूर करण्याची सध्या गरज आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.