Sudhir Mungantiwar Esakal
नागपूर
Sudhir Mungantiwar : १३ डिसेंबरपर्यंत मंत्रिपद पक्के होते, १५ ला नाव कटले; सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीमध्ये नाराजीचा स्फोट झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील मंत्रिपद पक्के असताना नाव कसे कटले, अशी भावना यापूर्वी व्यक्त केली.
नागपूर - ‘मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर माझे नाव त्या यादीत आहे, हे मला सांगण्यात आले. १३ डिसेंबरच्या सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझ्याबरोबर दोन-अडीच तास बसून चर्चा करत होते. तेव्हाही त्यांनी मला माझे नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचे सांगितले.