
नागपूर - भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. यानंतरही आपण नाराज नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला तयार आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे.
तरी हिवाळी अधिवेशनात ते दोन्ही दिवस अनुपस्थित राहिले. या दरम्यान ते नागपूरमध्येच आहेत. विधानसभेत येणे टाळून त्यांनी आपण नाराज असल्याचा भाजपला अप्रत्यक्ष संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे.