
अमरावती : कर्जमुक्ती योजनांपासून राज्यातील ६.५६ लाख शेतकरी वंचित असल्यामुळे आमदार सुलभा खोडके यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधत त्यांना या योजनेचे लाभ व अनुदान केव्हा देणार, असा सवाल लक्षवेधीतून उपस्थित केला. त्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी व राज्यस्तरीय बँकर्स समितीकडून पात्र व प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे लिखित उत्तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.