Vidarbha Weather : भर उन्हाळ्यात पावसाळी ‘फिल’! ढगांमुळे वातावरण आल्हाददायक, तापमानात दहा अंशांची घट,आणखी तीन-चार दिवस यलो अलर्ट
Pre Monsoon : मे महिन्यात असह्य उकाड्याने त्रस्त असलेल्या विदर्भात गुरुवारी ढगाळ वातावरणामुळे तापमानात दहा अंशांची घसरण झाली. अचानक आलेल्या गारव्यासह पावसाची शक्यता आणखी आठ दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
नागपूर : मे महिना म्हटला की विदर्भात उन्हाचे भयानक चटके अन् घाम फोडणारी गरमी असते. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडण्याचीही हिंमत होत नाही. मात्र यंदाचा मे महिना याला अपवाद ठरत आहे.