Digital Health Nagpur: तीन वर्षांनंतर मेयो आणि मेडिकलमध्ये सुपर ऑनलाइन सेवा सुरु; एका क्लिकवर रुग्णांची उपचार माहिती उपलब्ध

Super online system in Mayo and Medical Hospital Nagpur 2025: मेयो आणि मेडिकल रुग्णालयांमध्ये सुपर ऑनलाइन सेवा सुरु; रुग्णांना एका क्लिकवर उपचार माहिती मिळणार.
Patient treatment records go digital in Nagpur's Mayo hospitals
Patient treatment records go digital in Nagpur's Mayo hospitalssakal
Updated on

Mayo Medical Nagpur launches online medical record system: मेडिकल, मेयोतील हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमअंतर्गत (एचएमआयएस) असलेली ऑनलाइन सेवा ६ जुलै २०२२ रोजी अचानक बंद करण्यात आली. यामुळे रुग्णांना तीन वर्षे कमालीचा त्रास सहन करावा लागला. आता येत्या ऑक्टोबरमध्ये मेडिकल, मेयोसह शासकीय दंत महाविद्यालय आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात ऑनलाइन सेवा पुन्हा सुरू होणार आहे.

याचा फायदा रुग्णांना होणार असून रुग्णाच्या इतिहासाची डाटा बँक तयार होईल. तर नव्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरला एका क्लिकवर रुग्णांचा इतिहास कळेल. निदानासह औषधोपचाराची माहिती मिळेल रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास सोयीचे होणार असून ही प्रणाली रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने मेडिकल आणि मेयोत पुन्हा रुग्णांवर उपचारासंदर्भात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आदान-प्रदान होणार आहे. यासाठी २०२३ मध्ये एका नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरला काम ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याचे कंत्राट दिले. दोन वर्षापासून काम सुरू झाले. जुलै २०२५ मध्ये काम पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळाले. प्रत्येक रुग्णालयात हार्डवेअर, मल्टीफिकेशन आणि बारकोड स्कॅनर संस्थांपर्यंत पोचले आहेत.

तीन वर्षे रुग्णांना हा त्रास सहन करावा लागला

ऑनलाइन एचआयएमएस सिस्टिम २०१० मध्ये लावली होती. मात्र ६ जुलै २०२२ रोजी पर्यायी व्यवस्था निर्माण न करता अचानक ऑनलाइन सेवा बंद केली. यामुळे तीन वर्षे मेयो, मेडिकलसह सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभागांसह, एक्स रे युनिट, वॉर्ड, अभिलेखागार कार्यालयात रुग्णांच्या नातेवाइकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. रुग्णांची फरफट झाली. डिस्चार्ज कार्डचा तुटवडा, रुग्णांचा एमआरआय, सीटी स्कॅनसह एक्सरे अहवाल डॉक्टरांना ऑनलाइन बघता येत नव्हता. मोबाईलवर एक्स रे, एमआरआय डाऊनलोड करून आणावे लागत होते. या त्रासामुळे अनेकदा रुग्ण उपचारांशिवाय घरी परत जात होते.

ऑनलाइन प्रणालीचे फायदे

- रुग्णाची डाटा बँक तयार होईल

- बाह्यरुग्ण विभागात वेळेत केसपेपर निघतील

- ‘ई-वैद्यकीय’सुविधा उपलब्ध होईल

- पूर्वीच्या औषधोपचाराची माहिती होईल

- मेडिकल स्टोअर, रुग्ण शुल्क ऑनलाइन अदा होतील

- प्रयोगशाळेचा अहवाल, एक्‍स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन ऑनलाइन दिसणार

प्रत्येक रुग्णाला नोंदणी क्रमांक दिला जाईल. संबंधित विभागात डॉक्टर सेवा देतील. रुग्णाच्या नोंदणी रेकॉर्डवर वैद्यकीय अहवाल लिहिला जाईल. पुन्हा तपासणीला येताना रुग्णाला नोंदणी क्रमांक आणावा लागेल. जुना अहवाल आणणे गरजेचे नसेल. रुग्णांना दिलेला क्रमांक सांगितल्यानंतर संगणकावर अहवाल दिसेल. कामानिमित्त अन्य कारणात्सव इतर जिल्ह्यात रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी गेल्यानंतर या सिस्टिमचा फायदा होईल.

- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com