नागपूर : पारशिवनीलाच का काळ्या पाण्याची सजा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नळाला आलेले काळे पाणी.

नागपूर : पारशिवनीलाच का काळ्या पाण्याची सजा?

पारशिवनी - मागील चार-आठ दिवसांपासून प्रभाग ४ मधील रहिवाशांच्या घरी असलेल्या नगरपंचायतीच्या नळाद्वारे काळ्या रंगाचे दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याने येथील नागरिकांना काळे दूषित पाणी पिण्यासाठी बाध्य व्हावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रभाग क्रमांक ४ निवासी कमलाकर भोयर, दिलीप मोटघरे यांच्या घरी व वस्तीतील इतर घरी नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नळाद्वारे काळ्या रंगाचे, दूषित, किटाणूयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने येथील रहिवाशांना काळ्या रंगाचे पाणी पिऊन तहान भागविण्याची वेळ येथील‌ नागरिकांवर आली आहे.

भर उन्हाच्या दिवसात नगरपंचायत नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत नसल्याने येथील महिला मुलींना भरउन्हात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. चार आठ दिवसांआधी मेहर ले आउट येथील बांगडे यांच्या घरी नगरपंचायतीच्या नळातून पिण्याच्या पाण्यात ‘नारु’ आल्याची घटना घडली होती. उन्हाळ्यात नेहरु नगर, विश्वास नगर येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असताना नळामधून पाणी घरापर्यंत येताच पाणीपुरवठा बंद केला जात असल्याने येथील नागरिकांना पिण्यास व वापरण्याकरीता पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील महिलांना उन्हातान्हात विहिरीचे पाणी दोर बादलीने ओढावे लागते. नगरपंचायतीच्या माध्यमातून महिलांवर ही वेळ आली आहे.

शहरात कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी, कर्तव्यनिष्ठ नगराध्यक्ष, जागरुक स्थानिक प्रतिनिधी, या भागातील कर्तबगार आमदार, खासदार असताना जर येथील नागरिकांना दूषित काळे पाणी प्यावे लागत असेल, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल तर यासारखे दुर्दैव कोणते? नगरपंचायत प्रशासनाने तत्काळ या प्रभागात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Supply Of Black Water From Parshivni Nagar Panchayat Tap

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top