
नागपूर : विदर्भातील 86,409 हेक्टर झुडपी जंगलांच्या अधिसूचनेवरून महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल आज जाहीर केला. या निर्णयामुळे विदर्भातील या झुडपी जंगलाला वन संरक्षण प्राप्त झाले असून सहा जिल्ह्यांतील (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली) 86,409 हेक्टर झुडपी जमिनींचा विकासमार्ग मोकळा झाला आहे.