
नागपूर : यवतमाळ येथील एका विद्यार्थ्याची ओबीसी जातीच्या वादामुळे धोक्यात आलेली बी.टेक. पदवी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विशेष परिस्थितीचा विचार करून जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला या विद्यार्थ्याला चार जूनपर्यंत गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्याचे नाव आनंद पटेल असून, सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.