
नागपूर : अहमदाबाद येथे विमान कोसळल्यानंतर सर्वत्र आग, धुराचे लोळ आणि आक्रोश पसरला होता. सुरुवातीचे काही तास तर काय चाललंय हे काहीच कळत नव्हते, असा अंगावर काटा आणणारा अनुभव मांडला नागपूरकर डॉ. सुशांत देशमुख यांनी. शुक्रवारी सायंकाळी नागपुरातून माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपबिती सांगितली.