

Nagpur News
esakal
टाकळघाट: एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या आवारात कामगाराचा मृतदेह पाण्याच्या खोल टाकीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. दिनेश देवाजी सनेश्वर (रा. ब्राह्मणी, कळमेश्वर) असे मृताचे नाव असून ही घटना शनिवारी (ता.२८) सकाळी उघडकीस आली. अपघात की घातपात याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.