Nagpur youth allegedly cheated of ₹15.14 lakh on the promise of TCS job and car rental contract
sakal
नागपूर : टीसीए कंपनीमध्ये व्यवस्थापक असून तुमच्याकडे असलेली कार भाड्याने लावून देत, टीसीएसमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ठकबाजाने युवकाची १५ लाख १४ हजार ४५० रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी ओंकार नरेश सोनेवार (वय २३, रा. अभ्यंकर नगर, बजाजनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. अर्चीश गोविंदराव बडवाईक, (रा. गोवर्धन नगर, तहसील तुमसर, भंडारा) असे ठकबाजाचे नाव आहे.