Nagpur : प्रशासनाच्या जाचामुळे शिक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये उल्लेख पत्नीला फोनवर दिली होती माहिती

गजानन कराळे २०१२ मध्ये जी.एस. कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालयात हिंदीचे शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झाले.
Teacher suicide
Teacher suicidesakal

Nagpur : महाविद्यालयीन प्रशासनाच्या जाचामुळे जी. एस. कॉमर्स कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाने पत्नीला फोनवर माहिती देत, गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नरेंद्रनगर परिसरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

गजानन कराळे (वय ४२ रा. विजयानंद सोसासटी, नरेंद्रनगर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन कराळे २०१२ मध्ये जी.एस. कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालयात हिंदीचे शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झाले. ते मूळचे अमरावती येथील रहिवासी असून सध्या ते नरेंद्रनगर येथील विजयानंद सोसायटीमध्ये पडोळे यांच्या घरी काही वर्षांपासून पत्नी मंजूषा आणि पाच वर्षाचा मुलासह भाड्याने वास्तव्यास होते.

रविवारी पत्नी मुलासह अमरावती येथे नातेवाईकांकडे लग्नाला गेल्या होत्या. यावेळी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांनी पत्नीला फोन केला. यावेळी ते महाविद्यालयातील प्रशासनाच्या त्रासाबाबत बोलत होते. त्यातून त्यांनी आत्महत्या करण्याचेही बोलून दाखविले.

प्रशासनाच्या जाचामुळे शिक्षकाची आत्महत्या

पत्नीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि घरी येत असल्याचे सांगितले. दरम्यान गजानन यांनी हॉलमध्ये असलेल्या फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. रात्री पत्नी घरी परतल्यावर दार आतून लॉक होते. आवाज देऊनही उघडत नसल्याने घरमालकाच्या मुलांनी वर चढून खिडकीतून बघितले असता, हा प्रकार उघडकीस आला.

त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. याबाबत बेलतरोडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलला हलविला. तपासात कराळे यांनी सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे आढळून आले. ती ताब्यात घेत, पोलिसांनी प्राथमिक तपासणीत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

प्रशासनाचा जाच

जी. एस. कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षक असलेले गजानन कराळे हे हिंदी विषय शिकवित होते. त्यांना काही दिवसांपूर्वीच अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेचे प्रमुख बनविण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीपासून ते कसल्यातरी तणावात होते. सुसाईड नोटमध्ये त्यांनी प्रशासनातील विविध लोकांची नावे लिहिली असून कशाप्रकारे त्यांचा छळ झाला याबाबत नोंद करून ठेवली आहे. महाविद्यालयात अशाच प्रकारे शिक्षकांवर दबाव निर्माण केल्या जात असल्याची चर्चा आहे.

महाविद्यालय प्रशासनाकडून सातत्याने शिक्षकांची काळजी घेतली जाते. कराळे यांच्याद्वारेही अशी कधीच कुठली तक्रार करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, शनिवारी त्यांनी भेट घेत, प्रवेशाबाबत चर्चाही केली. मात्र, त्यांचे संस्थेबाबत काय विचार असतील हे आम्हाला माहिती नाही. महाविद्यालय नियमानुसारच काम करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com