Tehsildar Corruption : लाच घेताना सिंदखडचे तहसीलदार ताब्यात ; चालक व चपराशीही गजाआड, परभणीचे घर सील

येथील तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपयाची लाच घेतांना लाच-लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी तहसीलदार जैस्वाल यांच्यासह चालक मंगेश कुलथे, शिपाई पंजाबराव ताठे यांना ताब्यात घेतले आहे.
Tehsildar Corruption
Tehsildar Corruption sakal

सिंदखेड राजा : येथील तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपयाची लाच घेतांना लाच-लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी तहसीलदार जैस्वाल यांच्यासह चालक मंगेश कुलथे, शिपाई पंजाबराव ताठे यांना ताब्यात घेतले आहे. जैस्वाल यांच्या स्थानिक शासकीय निवासस्थानी ३७ लाख ५२ हजार १८० रुपये सापडले.

या प्रकरणातील तक्रारकर्त्याचा रेती वाहतुकीचा व्यवसाय असून त्याबाबतचा कायदेशीर परवानाही त्यांच्याजवळ आहे. परंतु सध्या रेती वाहतुकीचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे अवैध रेती वाहतूक करू देण्यासाठी तहसीलदारांना देण्यासाठी त्यांचा चालक मंगेश कुलथे याच्याकडून एका ट्रॅक्टरसाठी प्रति महीना ३५ हजार रुपये लाचेची मागणी होत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती.

या तक्रारीवरून आज शुक्रवारी (ता. १२ एप्रिल) तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार चालक कुलथे याने तक्रारदाराकडे तहसीलदारासाठी लाचेची मागणी केली. या मागणीला शिपाई ताठे यानेही प्रोत्साहन दिले. नंतर तहसीलदार जैस्वाल यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती देऊन रक्कम चालक मंगेशकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराला ३५ हजारांची रक्कम घेवून बोलावले. तहसील कार्यालयातील उपकोषागार कार्यालय परिसरात ३५ हजारांच्या लाचेची रक्कम घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांना रंगेहात पकडले.

सिंदखेडराजा येथील कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे बुलढाण्याचे पोलिस उपअधीक्षक शीतल घोगरे, वाशीमचे पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके, पलिस निरीक्षक सचिन इंगळे, एपीआय महेश भोसले, एएसआय शाम भांगे यांनी, तर परभणी येथील कारवाई विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, उपअधीक्षक अशोक इप्पर, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, चंद्रशेखर निलपत्रेवार, यांनी केली.

Tehsildar Corruption
Loksabha Election 2024 : न्यायाची हमी देणारा दस्तावेज ; काँग्रेसने मांडले ‘नवसंकल्प आर्थिक धोरण’

नऊ लाखांची रोकड जप्त

जैस्वाल यांचे परभणी येथेही घर आहे. पोलिसांनी परभणी येथील निवासस्थानांचीही झडती घेतली. पथकाने जैस्वाल यांच्या परभणीतील बंगल्यातून ९ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त केली. तसेच, त्यांचे चारमजली इमारतही पोलिस पथकाने सील केली. या कारवाईने शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com