esakal | दहावीचा निकाल : अमरावती विभाग ९९.९८ तर नागपूर ९९.८४ टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीचा निकाल : अमरावती विभाग ९९.९८ तर नागपूर ९९.८४ टक्के

दहावीचा निकाल : अमरावती विभाग ९९.९८ तर नागपूर ९९.८४ टक्के

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने शुक्रवारी (ता. १६) निकाल जाहीर केला. यात नागपूर विभागाचा निकाल ९९.८४ टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात ६ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, अमरावती विभागाचा निकाल ९९.९८ टक्के लागला असून या विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलीची टक्केवारी अधिक आहे. (tenth's-result-coronavirus-Wardha-district-in-the-lead-CBSE-tenth-result-nad86)

दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ५५ हजार ५०६ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी अंतर्गत मूल्यमापनात एक लाख ५५ हजार २३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. याशिवाय दहावीसाठी सहा हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पाच हजार ८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ८७.६६ आहे. विभागावार निकाल बघितल्यास वर्धा जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९९.९५ टक्के लागला. त्यापाठोपाठ गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९९.९२, गडचिरोली ९९.८९, नागपूर ९९.८६, भंडारा ९९.८४ तर चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी ९९.६४ टक्के लागला.

हेही वाचा: ‘...अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल’

उत्तीर्ण होणात मुलींच अव्वल

दहावीच्या निकालात यंदाही उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. मुलींनी बाजी मारली. सर्वाधिक ७५ हजार ४२१ म्हणजेच ९९.८८ टक्के मुली दहावीत उत्तीर्ण झाल्या. तर ७९ हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या यशाची टक्केवारी ९९.८० एवढी आहे.

जिल्हानिहाय निकाल

जिल्हा निकाल

 • भंडारा ९९.८४

 • चंद्रपूर ९९.६४

 • नागपूर ९९.८६

 • वर्धा ९९.९५

 • गडचिरोली ९९.८९

 • गोंदिया ९९.९२

 • ---------------------------

एकूण निकाल ९९.८४

अमरावती विभागाचा निकाल

अमरावती विभागाचा निकाल ९९.९८ टक्के लागला असून, विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. विभागाचा विचार केल्यास वाशीम जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला. वाशीमच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ९४.७३ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हा सर्वांत माघारल्याचे चित्र आहे.

२१ विद्यार्थी झाले नापास

कोरोनामुळे परीक्षा न घेताच सर्व विद्यार्थ्यांना पास करणाऱ्या या प्रक्रियेत सुद्धा २१ विद्यार्थी नापास झाले. आजवर नापास झालेल्यांची ही सर्वात कमी संख्या आहे. अमरावती विभागीय परीक्षा मंडळांतर्गत एक लाख ५८ हजार ८३९ विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षेसाठी नोंदणी झाली. त्यापैकी एक लाख ५८ हजार ८३७ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. मूल्यांकन प्राप्त झाल्यांपैकी एक लाख ५८ हजार ८१६ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत.

जिल्हानिहाय निकालाची टक्केवारी

जिल्हा निकाल

 • वाशीम 94.73

 • यवतमाळ 92.61

 • अमरावती 91.90

 • अकोला 90.35

 • बुलडाणा 84.21

(tenth's-result-coronavirus-Wardha-district-in-the-lead-CBSE-tenth-result-nad86)

loading image