महिलांवर काळाचा घाला; चारचाकी झाडावर आदळून चौघांचा मृत्यू| Terrible Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात छिन्न विछिन्न झालेली चारचाकी

महिलांवर काळाचा घाला; चारचाकी झाडावर आदळून चौघांचा मृत्यू

कोंढाळी (जि. नागपूर) : काटोल तालुक्यातील इसापूर शिवारात भरधाव बुलेरो पिकअप झाडावर (terrible accident) आदळल्याने चार महिला मजुरांचा मृत्यू (Four women killed) झाल्याची घटना शनिवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात सात जण गंभीर जखमी झालेत. सर्व मृत हे काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक येथील मजूर आहेत. या घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर आदळल्याने (Road accident) महिलांचा जीव गेला.

प्राप्त माहितीनुसार, मनीषा कमलेश सलाम (वय ३८), मंजूषा प्रेमदास उईके (वय ४०) व कलाताई गंगांधर परतेती (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मंजुळा वसंता धुर्वे (वय ५०) यांचा नागपूर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर सात जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. जखमी वृंदा अशोक दुधकवळे (वय १७), चैतानी सलाम (वय ३०), कलावंता संतोष पेंदाम (वय ५५), येनुबाई दुधकवळे (वय ३०), लक्ष्मीबाई तायडे (वय ३४, सर्व अंबाडा सोनक), विशाल बांदे (मोहपा), वाहक आकाश बत्तासे (मोहपा) या जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: सोने स्वतःत खरेदीची आताच संधी; भाव ५५ हजारांवर जाणार

मोहपा येथे संत्रागाडी भरून काटोल तालुक्यातील अंबाडा गावातील हे ९ महिला मजूर, चालक व वाहक असे ११ जण मोहप्यावरून सावनेरमार्गे काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक यांच्या मूळगावी महिंद्रा बुलेरो पिकअपने परत येत होते. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमार ही घटना घडल्याची माहिती आहे. घटना रात्री उशिरा घडल्याने (Road accident) काटोल पोलिसांना दीड तासाने म्हणजे सकाळी पाच वाजताच्या सुमारास माहिती मिळाली.

लागलीच पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर व सहायक निरीक्षक मनोज चौधरी यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी काही महिला मजूर व ड्रायव्हर गाडीत दबून असल्याचे त्यांना आढळले. त्यांना गाडीबाहेर काढण्यात बरीच कसरत करावी लागली. मागे बसलेल्या जखमींना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे सगळ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आला. यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमींना नागपूरला उपचारासाठी पाठवले. यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित पाच महिला मजूर चालक व वाहक असे सात गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top