थाटामाटात लग्न अंगलट; महापालिकेची बक्कळ कमाई

कुटुंबप्रमुखासह लॉन मालकांकडून ७५ हजार वसूल
Thattamatat Lagna Anglat nagpur Municipal Corporation huge income
Thattamatat Lagna Anglat nagpur Municipal Corporation huge income sakal

नागपूर : लग्न समारंभात ५० नागरिकांची मर्यादा असताना लॉनमध्ये मोठ्या संख्येत वऱ्हाडी मंडळी दिसून आल्याने महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) उपद्रव शोध पथकाने आज तीन लॉनवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे लॉन मालकासह लग्न समारंभ आयोजित करणाऱ्या कुटुंबप्रमुखांकडूनही दंड वसूल करण्यात आला.

Thattamatat Lagna Anglat nagpur Municipal Corporation huge income
शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमचा हार

महानगरपालिकेतर्फे लग्न समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या मंगळवारी झोनअंतर्गत गोरेवाडा येथील लक्ष्मी लॉन, केआरसी लॉन आणि आमराई लॉनमध्ये कोविड नियमाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. या तिन्ही लॉनमध्ये ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी दिसून आले. आयुक्तांनी कालच याबाबत आदेश काढले होते. आज उपद्रव शोध पथकाने गोरेवाडा परिसरात लॉनची तपासणी केली. यात प्रत्येकी २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यात मंगल कार्यालय, लॉन मालकाला प्रत्येकी १५ हजार आणि कुटुंब प्रमुखांवर प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारण्यात आला. याशिवाय उपद्रवशोध पथकाने प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरुद्ध कारवाई केली.

Thattamatat Lagna Anglat nagpur Municipal Corporation huge income
नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी १०६ जागा

गांधीबाग झोनअंतर्गत इतवारी मार्केट येथील मे. विनोद प्लास्टिक दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रवशोध पथकाने शुक्रवारी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय उपद्रवशोध पथकाने हनुमाननगर झोनअंतर्गत पूजा कलेक्शन ॲण्ड स्टेशनर्स भारत मातानगर, हुडकेश्वर येथून १२ प्लास्टिक पतंग जप्त केल्या व १ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ५४ पतंग दुकानांची तपासणी केली. उपद्रवशोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com