Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

ध्यानी, मनी नसताना पोटच्या मुलाची किडनी निकामी झाल्याचे समजताच हादरून गेलेल्या, परंतु हिम्मत न हारता आपली एक किडनी मुलाला देऊन त्याला जीवनदान देणाऱ्या पुसदजवळील आरेगावच्या एका आईने आपले ममत्व कायम ठेवले.
Kidney Transplant
Kidney Transplant sakal
Updated on: 

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : ध्यानी, मनी नसताना पोटच्या मुलाची किडनी निकामी झाल्याचे समजताच हादरून गेलेल्या, परंतु हिम्मत न हारता आपली एक किडनी मुलाला देऊन त्याला जीवनदान देणाऱ्या पुसदजवळील आरेगावच्या एका आईने आपले ममत्व कायम ठेवले. नांदेड येथील किडनी तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांनी यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले आणि ऋतिकला जीवनदान मिळाले.

पुसदपासून जवळ असलेल्या आरेगाव येथील ‘सकाळ’चे बातमीदार गिरिधर ठेंगे यांचा पुतण्या ऋतिक प्रकाश ठेंगे (वय२१) हा बी.एस्सी. अंतिम वर्षाला पुसद येथील फुलसिंग नाईक विद्यालयात शिकतो. जानेवारी महिन्यात त्याची प्रकृती ढासळल्याने त्याला पुसद येथील डॉक्टरांना दाखविले असता त्याच्या शरीरातील दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. हे ऐकून त्याची आई वडील व कुटुंबाला मोठा धक्का बसला.

डॉक्टरांनी रुग्ण ऋतिक याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटलमधील किडनी विकार तज्ज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. ऋतिकला घेऊन त्याची आई व नातेवाईक डॉ. शहाजी जाधव यांच्याकडे गेले. त्यांनी ऋतिकला किडनी प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले.

Kidney Transplant
Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

वडील प्रकाश ठेंगे व आई ज्योती (वय ४५) यांनी धीर न सोडता ऋतिकला बरे करण्याचा आत्मविश्वास मनात जागविला आणि आईने किडनी देण्याची तयारी दर्शविली. तपासणी झाल्यानंतर आईची किडनी ऋतिकच्या शरीरात दान करण्यास योग्य असल्याचे डॉ. जाधव यांनी नातेवाइकांना सांगितले. २४ एप्रिल ऋतिकसाठी जीवनदान देणारा दिवस ठरला. आईच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण ऋतिकच्या शरीरात करण्यात आले. प्रत्यारोपण झाल्यानंतर दोघांच्याही प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याने संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Junnar Man Gets New Life After Kidney Transplant In Pune As Wife Donates Kidney Following Months Of Dialysis Treatment
Tim Andrews Lives Nine Months With Genetically Modified Pig Kidney Without Dialysis in World First Medical Breakthrough
Kidney Donation and Successful Transplant Surgery Inspiring Family Story of Husband Wife and Mother Son Saving Lives and New Hope
CPR Hospital Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com