देशाचे संरक्षण करणारे श्वान निवृत्तीनंतर तसेच सोडले जातात हे दु:खदायक: नागपूर खंडपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur bench

देशाचे संरक्षण करणारे श्वान निवृत्तीनंतर तसेच सोडले जाते. हे खरोखरच दु:खदायक आहे, अशी भावना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केली.

देशाचे संरक्षण करणारे श्वान निवृत्तीनंतर तसेच सोडले जातात हे दु:खदायक

नागपूर: पुनर्वसनाशी संबंधित प्रकरणांमध्ये सेवानिवृत्त प्राण्यांना अमानुषपणे हाताळले जाते. वृद्धाश्रमासारख्या निवृत्त प्राण्यांच्या संदर्भात काही उपाय योजना करता येईल, अशा निवृत्त प्राण्यांची काळजी घेण्यासाठी काय धोरण आखता येईल? अशी विचारणा करीत देशाचे संरक्षण करणारे श्वान निवृत्तीनंतर तसेच सोडले जाते. हे खरोखरच दु:खदायक आहे, अशी भावना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त करीत बुधवारी न्यायालयाने भारतीय पशुकल्याण मंडळाला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: नागपूर : विद्यापीठाच्या परीक्षा होणार ‘ऑड-इव्हन’

सशस्त्र दलातील श्वानांच्या निवृत्तीनंतर त्यांना गोळी झाडून वा इंजेक्शन देऊन मारण्यात येते. या वृत्ताची खंडपीठाने दखल घेत स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. रेल्वे पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, पोलिस विभाग यांच्याकडे श्वान असतात. बरेचदा श्वानांच्या मदतीमुळे तपासकार्यामध्ये मोलाची मदत झाली आहे. साधारणत: हे श्वान दहा ते बारा वर्षे आपली सेवा देतात. सेवाकाळामध्ये यांना रँक तसेच पगारदेखील देण्यात येतो. मात्र, यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येते.

निवृत्तीनंतरच्या काळात त्यांचे काय? याबाबत कुठलेही धोरण नाही. त्यांना ना दत्तक देण्याची सोय आहे ना पालनपोषणाची. यामुळे यांना निवृत्तीनंतर मारण्यात येते. अमेरिकेसारख्या देशामध्ये निवृत्तीनंतरही श्वानांचे पालनपोषण करण्यात येते. तसेच त्यांना प्रशिक्षित करणाऱ्या प्रशिक्षकालाच त्याच्या उर्वरित पालनपोषणाची जबाबदारी देण्यात येते. त्यासाठी लागणारा खर्च सरकारतर्फे करण्यात येतो. मात्र, भारतामध्ये याबाबत कुठलेही धोरण नाही. काही दिवसांपूर्वीच रेल्वेचा रेनो नावाचा श्वान निवृत्त झाला असता त्याला दत्तक घेण्याची तयारी एका सधन गृहस्थाने दर्शविली. परंतु, तशी कुठलीही तरतूद नसल्याचे कारण देत त्याला परवानगी नाकारण्यात आली. आयुष्यातील उमेदीचा काळ देशाच्या सेवेसाठी घालविणाऱ्या या श्वानांच्या निवृत्तीनंतर धोरण ठरविण्याची मागणी न्यायालयीन मित्र अ‍ॅड. एस. एस. संन्याल यांनी केली आहे. याप्रकरणी अ‍ॅड.नितीन लांबट यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा: बंद नागपूर फ्लाइंग क्लबला अडीच कोटी

१२ जवानांचे वाचविले प्राण

लकी नामक श्वानाने आसाममध्ये १२ जवानांचे प्राण वाचवले होते. बंडखोरांनी दफन केलेले स्फोटक त्याने शोधून काढले होते. मात्र, लकीचे वय झाल्यावर त्याला निवृत्त करण्यात आले. जम्मू कश्मीरमध्ये सेवा दिलेला लकी सावनेरला आला. तो मरन्नासन्न अवस्थेत असताना त्याच्यावर स्थानिक पशुवैद्यकाकडून उपचार केले गेले. लकी केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) स्निफर डॉग होता.

Web Title: The Nagpur Bench Said It Was Saddening That Dogs Protecting The Country Were Released After Retirement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur