esakal | प्राचार्य डॉ. संजय गोविंदराव पोहरकर यांचे निधन

बोलून बातमी शोधा

dr. sanjay govindrao poharkar

नागपूर विद्यापीठात मोठे नाव होते. संघ परिवार क्षेत्रातील संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या स्वीकारल्या आणि पार पडले.

प्राचार्य डॉ. संजय गोविंदराव पोहरकर यांचे निधन
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनीद्वारा संचलित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील प्राचार्य डॉ. संजय गोविंदराव पोहरकर यांचे आज सकाळी 22 एप्रिल रोजी सकाळी 4 वाजता दुःखद निधन झाले. ते उत्तम वक्ता, लेखक, कवी, नाट्य लेखक, विचारवंत आणि मार्गदर्शक होते.

बालपणापासून संघाचे स्वयंसेवक असून तृतीय वर्ष शिक्षित होते. त्यांचे अनेक ग्रंथ, कविता संग्रह प्रकाशित झाले होते. देव अंघोळी गेले हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध होते. त्यांनी नागपूर विद्यापीठात स्वा. सावरकर यांच्यावर पहिली पी एच डी केली होती. अखिल भारतीय सावरकर संमेलनाचे अंदमान निकोबार येथे सावरकर यांच्यावर व्याख्यान केले. सावरकर यांचे बंधू बाळा राव सावरकर यांच्यासोबत निकटचे संबंध होते. ते पी एच डी चे गाईड होते. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थी डॉक्टरेट झाले होते.

नागपूर विद्यापीठात मोठे नाव होते. संघ परिवार क्षेत्रातील संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या स्वीकारल्या आणि पार पडले. 1999 ला कारसेवकचे नेतृत्व त्यांनी केले होते. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख होते. स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा संयोजक होते. शिक्षण मंचाचे भंडारा जिल्हाचे सर्वेसर्वा होते. अभाविप ते विश्व हिंदू परिषद या आणि इतर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या स्वीकारल्या होत्या. त्यांच्या निधनाने संघ, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, तीन मुली, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.