Nagpur News : चपराश्याच्या मदतीने संदीपने फोडला पेपर, पोलिसांच्या तपासात उघड; चारही आरोपींची कारागृहात रवानगी

Board Exam Paper Leak 2026 : नागपूरच्या विद्यासाधना कॉन्व्हेंट केंद्रावर चपराशाच्या मदतीने बारावीचे पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे; व्हॉट्सॲपद्वारे पेपर व्हायरल करून लाखोंची कमाई केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Board Exam Paper Leak 2026

Board Exam Paper Leak 2026

esakal

Updated on

नागपूर : सेंट उर्सुला केंद्रावर बारावी रसायनशास्त्राचा पेपर विद्यार्थिनीच्या मोबाइलवर आल्याने एकच खळबळ उडाली होती. बोर्डाच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर तपासात ८ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीमध्ये जयताळ्यातील विद्यासाधना कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेजमधील केंद्रावर चपराश्‍याच्या मदतीने आरोपी संदीप सरटकर याने पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अविनाश आडे (वय ३५) या चपराश्‍यालाही ताब्यात घेतले आहे. मुस्तफाच्या चौकशीत त्याच्या व्हॉट्सॲपवर गणिताचा पेपरही आला असल्याचे पुढे आले आहे. मुस्तफा याच्या शिकवणी वर्गात शिक्षक असलेला अल्ताफ गोडील याने परिचयात असलेला दिनेश कोटांगळे याला बारावीच्या विज्ञान शाखेतील विषयांचे पेपर मागितले. त्याने ‘एज्युकेशन ॲकॅडमी’चे संचालक मनीष शंभरकर याच्या माध्यमातून प्रदीप जांगडे याची भेट घेण्यास सांगितले. प्रदीप मुख्याध्यापक असल्याने त्याला संपर्क केला. त्यानंतर प्रदीपने दुसऱ्या दिवशी सकाळी अल्ताफला कॉल करून बोलावून घेतले. याभेटीत त्याला प्रश्‍न आणि एमसीक्यू दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com