
नागपूर : राज्य सरकारने महापालिकांची निवडणूक चार सदसीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपुरातील महायुती आणि महाविकास आघाडीतील दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह इतरही लहान पक्षांचे टेंशन वाढले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी कायम राहिली तरच या पक्षांचे राजकीय अस्तित्व कायम राहणार आहे. अपक्ष आणि इतरही पक्षांचे चांगलीच कसरत करावी लागणार आहे.