esakal | बोंबला! दहावीच्या निकालाचे संकेतस्थळच ‘क्रॅश’; विद्यार्थ्यांची धावपळ
sakal

बोलून बातमी शोधा

बोंबला! निकालाचे संकेतस्थळच ‘क्रॅश’; विद्यार्थ्यांची धावपळ

बोंबला! निकालाचे संकेतस्थळच ‘क्रॅश’; विद्यार्थ्यांची धावपळ

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : राज्याच्या शिक्षण मंडळाद्वारे शुक्रवारी (ता. १६) दुपारी एक वाजता दहावीच्या निकालाची संकेतस्थळावर घोषणा करण्यात आली. निकाल बघण्यासाठी http://result.mh-ssc.ac.in आणि www.mahahsscboard.in संकेतस्थळ देण्यात आले. मात्र, निकालाची घोषणा झाल्यावर लगेच संकेतस्थळ ‘क्रॅश’ झाले. त्यामुळे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना निकाल बघता आला नाही. याप्रकाराने विद्यार्थी आणि पालकांची धावपळ झाली. (The-website-of-the-10th-result-crashed-nad86)

यंदा परीक्षा रद्द झाल्याने नववी आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला. त्यामुळे निकालात कोणत्या विषयात किती गुण मिळाले याची उत्सुकता शिगेला होती. त्यामुळे दहावीच्या निकालाची घोषणा झाल्यावर जवळपास सर्वच विद्यार्थी आणि पालकांनी घरच्या लॅपटॉप आणि मोबाईलवर निकालाचे संकेतस्थळ सुरू करीत निकाल शोधण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: ‘...अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल’

मात्र, संकेतस्थळ टाकताच ते हॅंग झाल्याचे दिसून आले. बराच वेळ निकालाचे संकेतस्थळ न उघडल्याने पालक आणि विद्यार्थी हैराण झाले. त्यामुळे पालकांनी कुठे दुसरीकडे संकेतस्थळ सुरू होते काय? याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, सर्वज्ञच ही समस्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निकालाचा संकेतस्थळातील ‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यात ही समस्या असल्याचे सांगितले. त्यामुळे किमान सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना निकालच बघता आला नाही.

शाळांकडूनही निराशाच

निकालाच्या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र, यंदा कोरोनामुळे शाळांमध्ये निवडक कर्मचारी आणि शिक्षकांना परवानगी देण्यात आली होती. अशात संकेतस्थळ ‘क्रॅश’ झाल्याने काही शाळांमध्ये विद्यार्थी पालकांनी फोन करून विचारणा केली. मात्र, तिथेही पालकांना निराशा हातात पडली. याशिवाय काही शाळा बंद असल्याचेही आढळून आले.

(The-website-of-the-10th-result-crashed-nad86)

loading image