अधिकाऱ्यांच्या आकडेवारीवर पदाधिकारी डोलावतात मान; खड्डे मात्र जैसे थे; काय आहे गौडबंगाल

there is  difference between employees and officers in numbers of bad roads
there is difference between employees and officers in numbers of bad roads

नागपूर : महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच हजार खड्डे बुजविल्याचा दावा केला असून पदाधिकाऱ्यांनीही निमूटपणे ऐकून घेतले. पदाधिकारी फूटपट्टी घेऊन खड्डे मोजत नसल्याची जाण असल्याने अधिकारी खड्ड्यांची आकडेवारी बैठकीत सादर करीत असल्याची परंपरा यंदाही कायम असल्याचे चित्र आहे. खड्डे बुजविलेल्या रस्त्यांची नावे मात्र सांगण्यास अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाळल्याचे दिसून येत आहे.

शहरातील खड्ड्यांबाबत महापौर संदीप जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. बैठकीत कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, मॅकेनिकल इंजिनिअर योगेश लुंगे, उप अभियंता कमलेश चव्हाण उपस्थित होते. शहरात खडडयापासून नागरिकांना त्रास होत आहे. हॉट मिक्स प्लान्ट विभागाने खड्डे बुजविण्याची कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी देताच अधिकाऱ्यांनी त्यांच्यापुढे जानेवारी ते ऑगस्टपर्यंत बुजविलेल्या खड्ड्यांची आकडेवारी मांडली. 

आठ महिन्यांच्या काळात शहरातील सुमारे ५०३८ खड्डे महानगरपालिकेच्या वतीने बुजविण्यात आले. सुमारे ९४ हडार २४० वर्ग फूट परिसरातून समतल करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. हॉट मिक्स प्लान्टच्या माध्यमातून ८२५२२.८२ वर्ग मीटर क्षेत्रातील ३८७६ खड्डे बुजविण्यात आले. जेट पॅचरच्या माध्यमातून ४३२४.८२ वर्ग मीटर क्षेत्रातील ३१२ खड्डे तर इन्स्टा रोड पॅचरच्या माध्यमातून ७३९४.५७ वर्गमीटर क्षेत्र असलेले ८५० खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

हॉट मिक्स प्लान्टकडून १ जानेवारी ते ३० ऑगस्टदरम्यान लक्ष्मीनगर झोनमधील ५२३ खड्डे, धरमपेठ झोनमध्ये ३८५ खड्डे, हनुमाननगर झोनअंतर्गत ३८० खड्डे, धंतोली झोनअंतर्गत २४८ खड्डे, नेहरूनगर झोनमध्ये ६८० खड्डे, गांधीबाग झोनमधील ३३४ खड्डे, सतरंजीपुरा झोनमधील १३६ खड्डे, लकडगंज झोनमध्ये २३१ खड्डे, आशीनगर झोनमधील ३८४ खड्डे आणि मंगळवारी झोनमधील ५७५ असे एकूण ३८७६ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. मात्र कुठल्या रस्त्यांवरील किती खड्डे बुजविण्यात आले, याबाबत माहिती देण्याचे अधिकाऱ्यांनी टाळल्याचे महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीवरून दिसून येत आहे. खड्डे बुजविण्याचे गौडबंगाल यंदाही कायम आहे.

लॉकडाउनमध्ये कसे बुजविले खड्डे?

अधिकाऱ्यांनी जानेवारी ते ऑगस्टपर्यंत पाच हजार खड्डे बुजविण्याचा दावा केला. मुळाच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर दोन महिने लॉकडाउनचा काळ होता. या काळात मजूर वर्गही उपलब्ध नव्हता. कर्मचाऱ्यांची संख्याही मर्यादित होती. अशा काळात महापालिकेने खड्डे कसे बुजविले? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खड्ड्यांबाबत माहिती कुठे द्यावी?

शहरात अजूनही अनेक भागातील रस्त्यांवर खड्डे आहेत. नागरिकांना याबाबत तक्रार करायची असेल तर नेमकी कुठे करायची? असा प्रश्न आहे. मागील वर्षी आयुक्त अभिजित बांगर यांनी यासंदर्भात potholecomplaints@gmail.com हा मेल आयडी उपलब्ध करून दिला होता. मात्र, यंदा अशी कुठलीही यंत्रणा नसल्याचे दिसून येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com