Nagpur Rain : नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली असली तरीही अधिकृत मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळतो आहे.
नागपूर : बुधवारी चोरपावलांनी विदर्भात दाखल झालेल्या मॉन्सूनची गती मंदावली असली तरी, उपराजधानीत मात्र पाऊस नियमित हजेरी लावत आहे. बुधवार-गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही शहरात वरुणराजाने दमदार हजेरी लावली.