जादूने नोटा दुप्पट करण्याचे आमिष, पश्चिम बंगालहून मांत्रिकांना अटक

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नागपूर : चार लाख रुपयांच्या नोटा जादूने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका फळविक्रेत्याला चार लाखांनी गंडा (Fraud case) घालण्यात आला. गंडा घालणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या दोन मांत्रिकांना पारडी पोलिसांनी (nagpur crime news) अटक केली. सौमिक सुजयकुमार घोष (३७) आणि इद्रिस युनूस मिस्त्री (४८) दक्षिण परगणा (प. बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत.

Crime News
शिवसेनेत होणार मोठा स्फोट? अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत

शिवनगर येथे राहणारे लीलाधर मनोहर शाहू यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. २५ जुलै रोजी ते आपल्या दुकानात हजर असताना खैरूल शेख नावाचा एक आरोपी त्यांच्या दुकानात आला. मी फळ व्यापारी असून बरेपूर (कोलकाता) येथे फळविक्रीचा व्यवसाय करतो असे सांगितले. काही व्यवहारही केला. दरम्यान, खैरूलने ‘मी एक नोटा डबल करून देतो’ असे सांगितले. मी प्रात्यक्षिक देखील करून दाखवितो असे सांगितले.

दुसऱ्या दिवशी शेख हा आपल्या तीन साथीदारांसह शाहू यांच्या घरी आला. आरोपींनी बकेटमध्ये जादूचे पाणी टाकले आणि शंभर रुपयांच्या चार नोटा टाकून त्यावर झाकण लावले. दहा मिनिटात झाकण उघडले असता त्यात आठ नोटा होत्या. त्यामुळे लिलाधर यांचा विश्वास बसला. आरोपींनी लिलाधर यांना जास्त रक्कम जमविण्यास सांगितले. ही बाब त्यांनी मित्र प्रफुल्ल डायरे यांना सांगितली.

घर ठेवले गहाण -

काही दिवसांपूर्वी शाहू यांना कोरोना झाला होता. त्यावेळी त्यांनी घर गहाण ठेवून सावकाराकडून ५ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी ३ लाखांची रक्कम शाहूकडे होती. त्या रकमेतून व्यापार वाढवायचा होता. अशा स्थितीच या आरोपींनी त्यांना जाळ्यात अडकविले. तीन लाख जवळचे आणि १ लाख मित्र प्रफुलकडून उधार घेतलेले असे चार लाख जमवले आणि मांत्रिकांना घरी बोलावले.

नोटांऐवजी कागदाचे बंडल -

३१ जुलै २०२१ रोजी चारही आरोपी शाहू यांच्या घरी आले. आरोपींनी चार लाखांची बंडल त्यांच्या हाती दिले. नोटांची बंडल बकेटमध्ये टाकण्याचा बनाव केला. भांड्यावर झाकण ठेवले आणि तीन तासांनी भांडे उघण्यास सांगितले. आम्ही नास्ता करून येतो असे सांगून चारही आरोपी निघून गेले. तीन तास झाले तरी भामटे न आल्याने शाहू यांना संशय आला. त्यांनी झाकण उघडून असता त्यात कागदाचे बंडल आढळून आले.

असा लागला छडा -

पारडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल ट्रेस केले असता त्याचे लोकेशन प. बंगालचे येत होते. त्यानुसार पीआय मनोहर कोटनाके यांनी एक पथक पश्‍चिम बंगालला रवाना झाले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन नागपूरला आणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com