
नागपूर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान गुरुवारी होणाऱ्या एकदिवसीय सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू असून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तिघांना अटक करून ११ तिकीट जप्त केली. विशेष म्हणजे, काल सदर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दोघांना अटक करून सहा तिकीट जप्त केल्या होत्या.