अंत्यसंस्कारावेळी डिझेलच्या भडक्याने तिघे भाजले; दोघांची प्रकृती नाजूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Three burned diesel blaze funeral 2 serious in hospital nagpur

अंत्यसंस्कारावेळी डिझेलच्या भडक्याने तिघे भाजले; दोघांची प्रकृती नाजूक

कामठी (जि. नागपूर) : अंत्यसंस्कार विधी दरम्यान अग्नी देत असताना उडालेल्या भडक्याने या कार्यक्रमात सहभागी झालेले तिघे जण भाजल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत आज गुरूवार (ता.२८) रोजी दुपारी तीन वाजता सुमारास कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम येथे घडली असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, स्थानिक मोदी पडाव नागसेन नगर येथील रहिवासी सिद्धार्थ अंतुजी हुमने या इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याने आज गुरुवार ता. २८ जुलै रोजी दुपारी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी उरकण्यात येत असताना या कार्यक्रमा दरम्यान मृतकाला अग्नी देत असताना टेंबा लावून डिझेलचा भडका उडाल्याने कार्यक्रमात सहभागी झालेले सुधीर महादेव डोंगरे (४५), सुधाकर बुधाजी खोब्रागडे (६०) दोघेही राहणार नागसेन नगर कामठी व दिलीप घनश्याम गजभिये (६०) रा. न्यू खलाशी लाईन कामठी तिघे जण भाजल्याने गंभीर जखमी झाले.

त्यावेळी उपस्थितांची एकच धावपळ उडाली. नागरिकांनी लगेच त्यांना उपचारार्थ कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता यातील सुधीर डोंगरे व दिलीप गजभिये यांची परिस्थिती नाजूक असल्याने यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले तर अन्य जखमी सुधाकर खोब्रागडे यांच्यावर कामठीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Three Burned Diesel Blaze Funeral 2 Serious In Hospital Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top