Nagpur Accident : मालवाहू-ट्रक धडकेत तीन ठार; एक गंभीर, काटोल नवीन नाक्याजवळील घटना
Nagpur News : नागपूरमध्ये नवीन काटोल नाका रस्त्यावर रविवारी भरधाव वेगात ओव्हरटेक करताना मालवाहू वाहन व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार, तर एक स्कुटीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
नागपूर :ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहू आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना गिट्टीखदान पोलिस हद्दीत नवीन काटोल नाका मार्गावर रविवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास घडली.