सोनू हा वर्धेतील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने आकाशच्या मदतीने अनेक गुन्हे केले आहे.
नागपूर : शहरात टोळीयुद्ध सुरू झाले असून त्यातून गेल्या पंधरा दिवसात पाच गुंडांचा खून (Murder Case) झाला आहे. गुरुवारी (ता. २०) मध्यरात्री अशाच टोळीयुद्धातून इमामवाडा पोलिस ठाण्याच्या (Imamwada Police Station) हद्दीतील रामबाग परिसरात कुख्यात गुंडाचा तिघांनी खून केला. विशेष म्हणजे, हा गुंड त्याच दिवशी प्रतिबंधात्मक कारवाईतून कारागृहातून सुटून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.