Thumb Transplant: तुटलेल्या अंगठ्याचे प्रत्यारोपण, मध्यप्रदेशातील तरुणाचे अपंगत्व टळले

Nagpur News: डॉक्टरांच्या टीमने सर्जिकल मायक्रोस्कोपचा वापर करून जटिल अंगठा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करीत त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचे पुन्हा जागच्या जागी प्रत्यारोपण केले.
Thumb Transplant
Thumb TransplantEsakal
Updated on

नागपूर: स्पोर्ट्स बाईकच्या चेनला ग्रीसिंग करताना कपड्यात उजव्या हाताचा अंगठा अडकून तो चेनमध्ये ओढला गेला. पण निम्म्याहून अधिक तुटलेल्या या अंगठ्याचे पुन्हा प्रत्यारोपण करीत डॉक्टरांच्या टीमने रुग्णाला भविष्यातील अपंगत्वापासून वाचविले.

मध्य प्रदेशातील फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणारा हा महाविद्यालयीन तरुण आपल्या दुचाकीची चैन साफ करीत होता. कपड्याचा आधार घेऊन चैनवरील ग्रीस साफ करत असताना त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कपड्यात अडकून चेनमध्ये ओढला गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याच्या मज्जातंतूंच्या ऊतींना आणि रक्तवाहिन्यांना गंभीर दुखापत झाली.

Thumb Transplant
Nagpur News : ‘ड’ वर्ग ग्रंथपालास ना ‘मान’ ना ‘धन’ ; मजुरापेक्षाही कमी वेतन

सुरुवातीला कुटुंबीयांनी स्थानिक रुग्णालयात धाव घेतली. त्याची अवस्था पाहता ग्रीन कॉरिडॉरमार्फत त्याला तातडीने क्रिम्स हॉस्पिटल्समध्ये हलविण्यात आले. रुग्ण हॉस्पिटल्सला पोहोचताच १० मिनिटांत शस्त्रक्रिया सुरू झाली.

Thumb Transplant
Side Effects Of Mobile : मोबाईल प्रेमाने कमी झाला जिव्हाळा, व्यसन ठरतेय घातक

डॉक्टरांच्या टीमने सर्जिकल मायक्रोस्कोपचा वापर करून जटिल अंगठा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करीत त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचे पुन्हा जागच्या जागी प्रत्यारोपण केले. रुग्णाची तब्येत स्थिरावल्यानंतर दोन दिवसांनी त्याला सुटी देण्यात आली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com