कोंढाळी : नागपूर जिल्ह्याच्या धोतीवाडा गावाजवळ गुरुवार (ता. १९) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास गुराखी चंदू ढोके यांच्यावर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुराख्याने आरडाओरडा करत धाव घेतल्याने परिसरातील शेतकरी धावून आले, वाघाने घटनास्थळावरून पळ काढल्याने गुराखी बचावला.