Tiger Reserves : राज्‍यातील व्याघ्र प्रकल्पांची जैवविविधता धोक्यात; चहूबाजूंनी देव तरोटा या निरुपयोगी झुडुपाचे आक्रमण

Pench Tiger Reserve : विदर्भातील व्याघ्र प्रकल्प व गवताळ क्षेत्रांमध्ये देव तरोटा (सेना युनिफ्लोरा) या आक्रमक वनस्पतीचा झपाट्याने प्रसार होत असून जैवविविधतेस मोठा धोका निर्माण झाला आहे.
Tiger Reserves
Tiger ReservesSakal
Updated on

नागपूर : मॉन्सूनच्या आगमनानंतर महाराष्ट्रातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांसह विदर्भातील जंगलांच्या शेजारी आणि गवताळ भागात देव तरोटा (सेना युनिफ्लोरा) या अत्यंत आक्रमक विदेशी वनस्पतीचा झपाट्याने प्रसार होत आहे. पेंच, ताडोबा-अंधारी, मेळघाट, बोर आणि नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांसह अमरावती, यवतमाळ प्रादेशिक क्षेत्रातील गवताळ कुरणातही त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे. मेक्सिको, मध्य व दक्षिण अमेरिकेत मूळ असलेल्या या वनस्पतीचा भारतातील वाढता प्रसार मोठ्या पर्यावरणीय संकटात रूपांतरित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com