

Farmers seek one 15-day irrigation cycle for wheat crops from the Toatladoh and Penchkhairi dams.
esakal
कन्हान, : तोतलाडोह आणि पेचखैरी धरणांत पाणीसाठा उपलब्ध असतानाही रब्बी हंगामातील गहू पिकासाठी सिंचनाचे पाणी नाकारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यांतील शेतकरी संतप्त झाले आहेत. गहू पिकासाठी किमान १५ दिवसांची एक पाळी द्यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रविवारी (ता. २५) राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांना निवेदन दिले.