
नागपूर : विदर्भात मंगळवारी (ता. ८ जुलै) रात्री व आज बुधवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. मागील तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे नागपूर विभागातील ४३ तालुक्यांत, तर अमरावती विभागातील केवळ चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून नदी व नाल्यांना पूर आला आहे.