esakal | निसर्ग पर्यटनावरही कोरोनाचा परिणाम, गोरेवाडासह पेंचकडे पर्यटकांची पाठ
sakal

बोलून बातमी शोधा

tourist not come in gorewada pench due to corona

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वच अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. तब्बल सात महिन्याच्या कालावधीनंतर ५० टक्के क्षमतेने पर्यटन सुरू करण्यात आले. त्यामुळे पर्यटन व्यवसायासह स्थानिकांना रोजगार मिळण्यास सुरुवात झाली होती.

निसर्ग पर्यटनावरही कोरोनाचा परिणाम, गोरेवाडासह पेंचकडे पर्यटकांची पाठ

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उद्‍घाटन झालेल्या बाळासाहेब ठाकरे गोंडवाना प्राणिसंग्रहालय अल्पावधीत लोकप्रिय झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे अनेक आठवडे बुकिंग हाऊसफुल्ल होतो. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटकांची संख्या ५० टक्क्याहून अधिक घटलेली आहे. हीच स्थिती पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी आणि खुर्सापार प्रवेशद्वारवरही झालेली आहे. 

हेही वाचा - कुटुंब कल्याणाची जबाबदारी महिलांचीच का? सहा वर्षांत फक्त १,५४० पुरुषांनी केली नसबंदी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वच अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. तब्बल सात महिन्याच्या कालावधीनंतर ५० टक्के क्षमतेने पर्यटन सुरू करण्यात आले. त्यामुळे पर्यटन व्यवसायासह स्थानिकांना रोजगार मिळण्यास सुरुवात झाली होती. काही दिवसांपूर्वीच १०० टक्के क्षमतेने जिप्सीतून प्रकल्पात पर्यटकांना प्रवेश दिला जात होता. परिणामी, पर्यटन व्यवसायाला बुस्ट मिळू लागला होता. अचानकच कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने कोरोना बाधितांची संख्याही झपाट्याने वाढायला लागली आहे. त्यामुळेच स्थानिक प्रशासनाने आता शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठाने बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचा फटका गोरेवाडा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला बसू लागला आहे. पर्यटकांनी कोरोनाच्या भीतीमुळे पर्यटनासह बाहेर फिरण्यावर निर्बंध आणलेत. शनिवार आणि रविवारी निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचे नियोजन केलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडू लागले आहे. गोरेवाड्यात उद्‍घाटनानंतर हाऊसफुल्ल होत असलेल्या भ्रमंती करणाऱ्या बसेस आता रिकाम्या राहू लागल्या आहेत. क्षमतेपेक्षा फक्त ३५ ते ४० टक्केच पर्यटक येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


 

loading image