
अमरावती : चिखलदरा घाटरस्त्यामध्ये शहापूर येथून अर्धा किलोमीटर पुढे एक पर्यटकांची गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली. याबाबत माहिती मिळताच जिल्हा शोध व बचाव पथकाने आपल्या जिवाची पर्वा न करता वाहनातील सहा पर्यटकांना सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले. ही घटना आज दुपारी घडली.