
नागपूर : पर्यटक आमच्यासाठी परमेश्वर आहे. त्यांच्याशी असे जनावरासारखे कुणी कसे वागू शकते. पर्यटकांना मारणारे दहशतवादी हे ‘आदमी नही... जानवर है ये सब...’ आम्ही आता काय बोलणार... सर्वसामान्य काश्मिरी धक्क्यात आहे... निराश झाला आहे... हे संतप्त पण भावनिक उद्गार आहेत पहलगाममधील हॉटेल, ट्रॅव्हल्स व्यावसायिक उझेर नाझीर यांचे. मंगळवारी (ता. २२ एप्रिल) दहशतवाद्यांनी पहलगावनजीकच्या बैसरन खोऱ्यात हल्ला करून २८ पर्यटकांना ठार केले. त्याबाबत नाझीरभाई ‘सकाळ’शी बोलत होते.