
भद्रावती : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हॅाटेलमध्ये जेवायला गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतकात पती-पत्नीसह त्यांच्या दोन वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. एक सात वर्षाची मुलगी किरकोळ जखमी झाली. ही घटना काल मंगळवारला रात्री ९.३० वाजताच्या सुमाराला भद्रावती जवळील चंद्रपूर- नागपूर महामार्गावर डॅाली पेट्रोल पंपजवळ घडली.