Nagpur News : उमरेडच्या एमएमपी कंपनीतील स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू; सहा कामगारांची मृत्यूशी झुंज सुरू, आग नियंत्रणात

Factory Explosion : उमरेड येथील एमएमपी इंडस्ट्रीज कंपनीत भीषण स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. सहा कामगार मृत्यूशी झुंज देत असून, आग आता नियंत्रणात आली आहे.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

प्रवीण वानखेडे

उमरेड (जि. नागपूर) : धुरखेडा ग्रामपंचायत हद्दीतील एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यातील दोघांचा शनिवारी पहाटे नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तिघांचे मृतदेह कंपनीत होरपळलेल्या अवस्थेत आढळून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com