
नांदुरा : उज्जैन येथून देवदर्शन आटोपून गावाकडे परतत असलेल्या भाविकांची इर्टीगा कार राष्ट्रीय महामार्ग क्रं. ५३ वरील खातखेड फाट्याजवळ रस्त्यावर तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडलेल्या ट्रकवर मागून धडकली. हा भीषण अपघात सोमवारी (ता.१३) रोजी उत्तररात्री १.४८ वाजे दरम्यान घडला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर व तीन किरकोळ जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये आई, वडील व मुलाचा समावेश आहे.