

Brahmapuri Accident
ब्रह्मपुरी: शहरातील नेवजाबाई हितकारिणी शाळेत ध्वजारोहणासाठी जाणाऱ्या दोन एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला वेगाने येणाऱ्या अवैध वाळू तस्करीच्या ट्रॅक्टरने भीषण धडक दिली. या अपघातात एक विद्यार्थी मृत्यूशी झुंज देत आहे, तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास घडली. यश प्रकाश मेश्राम (वय १४), रोनक राजू नागापुरे (वय १४) अशी जखमींची नावे आहेत. यातील यश मेश्राम हा खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.