Triple Murder Shocks Nagpur : नागपूर येथे गुन्हेगारीचा कहर, जिल्ह्यात तिघांची हत्या; खाप्यात गोळी झाडली,साळवा येथे चौकीदारावर वार
Rising Crime in Nagpur : नागपूर जिल्ह्यात रविवारी तीन खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. खापा येथे भरदिवसा गोळीबारात युवकाचा जीव घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खापा : सावनेर तालुक्यातील खापा येथे भरदिवसा सिनेस्टाईल पाठलाग करत गोळ्या झाडून चेतन अशोक गागाटे (वय ३३) रा. हनुमान घाट, खापा या तरुणाची हत्या करण्यात आली. ही थरारक घटना रविवारी (ता.१५) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.