
वर्धा : दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना भरधाव मालवाहूने धडक दिल्याने दोघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सावंगी (मेघे) वळणमार्गावरील पुलाजवळ ही घटना घडली. क्रिश राहुल ठाकरे (वय १४) रा. सालोड हिरापूर, अभय राजू चौरसिया (वय १९) रा. बोरगाव मेघे आणि वैभव संतोष भंडारे (वय २२) बोरगाव (मेघे) अशी मृतांची नावे आहेत.