
हिंगणा : तालुक्यातील ईसासनी येथील भीमनगरात २२ मे रोजी शीतल जॉन्सन मंडपे (३९) हिचा मृत्यू झाल्याची माहिती पतीने हार्ट अटॅकमुळे झाल्याचे सांगितले होती. मात्र आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, शीतलचा मृत्यू अपघाती नसून हत्या झाली असावी, असा आरोप तिची आई गौतमी चव्हाण हिने केला आहे. यासंदर्भात तिने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.