
नागपर : पुण्यानंतर उपराजधानीत ‘गुलेयन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस)आजाराचे रुग्ण वाढत असून ११ फेब्रुवारीला दाखल झालेले ४५ वर्षीय बाधिताचा तीन दिवसांत उपचारानंतर १४ फेब्रुवारीला मृत्यू झाला. तर ८ वर्षांचा चिमुकलाही या आजाराने दगावला. या आजाराने उपराजधानीतील मेडिकलमध्ये अवघ्या पाच दिवसांत दोन मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. येथील रुग्णसंख्या १८ झाली आहे.