Drug Trafficking : नागपुरात पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांकडून ४५६ ग्रॅम एमडी जप्त केली असून त्याची किंमत ४५ लाख ६० हजार रुपये आहे. राजस्थानातून ड्रग्स आणून शहरात विक्री करणाऱ्या टोळीमधील दोघांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर : शहरात एमडीची तस्करी करणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांना गुन्हेशाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातून ४५ लाख ६० हजार रुपये किमतीचे ४५६ ग्रॅम एमडी जप्त केले.