जखमी प्रवाशांना समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे जालना येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघात होऊन दोन प्रवासी ठार झाले असून १० प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई कॉरिडॉरवर चॅनेल नंबर ३४४.७ वर आज (ता. ८) सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अपघात झाला आहे.