Nagpur News : पार्टीसाठी गेलेले दोन तरुण गोरेवाडा तलावात बुडाले; मानवतानगरात पसरली शोककळा
Water Accident : नागपूरच्या गोरेवाडा तलावात पार्टीसाठी गेलेले दोन तरुण पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. दारूच्या नशेत पोहता न येत असूनही पाण्यात उतरल्यानामुळे ही दुर्घटना घडली.
नागपूर : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या दोन युवकांचा गोरेवाडा तलावात बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेन परिसरात खळबळ उडाली आहे.