
शितलवाडी : शेतात काम करत असलेल्या दोन महिला शेतमजुरांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर पाच महिला जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी शितलवाडी चारगाव रस्त्यालगतच्या शेतात घडली. मंगलाबाई झिबल मोटघरे (४०, रा. शितलवाडी, परसोडा) वर्षा देवचंद हिंगे (३३ रा. भोजापूर) अशी मृतांची नावे आहेत.